प्रचलित शालेय शिक्षण पद्धतीत विद्यार्थी मूळ संकल्पना समजण्याऐवजी पाठांतरावर जास्त भर देताना आढळतात. पण शालेय स्तरीय स्पर्धा परीक्षा, भविष्यात करिअर ठरविणाऱ्या बहुतांश परीक्षा आणि उच्च शिक्षणाच्या प्रवेश पूर्व परीक्षा ह्या Multiple Choice व Negative Marking पद्धतीच्या असतात म्हणून विद्यार्थी गोंधळतात. अगदी लिटमस पेपर निळा की लाल हे पण पाठांतरानंतर ऐनवेळेवर हमखास चुकतात.
कुठलीही गोष्ट वाचल्यानंतर जर त्यावर प्रात्याक्षिक (Practical) करता आले तर ती गोष्ट कायमस्वरूपी लक्षात राहते व उत्तर देताना विद्यार्थी थोडाही गोंधळत नाही.
याच्या माध्यमातून विविध तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आमच्याकडून शाळेच्याच आवारात उच्च दर्जाची प्रयोगशाळा (Science Lab) उभारली जाईल, त्याला शालेय अभ्यासक्रमाचा एक घटक म्हणून समाविष्ट केला जाईल आणि शाळेच्याच शिक्षकांना संपूर्ण प्रशिक्षण दिले जाईल.
ज्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेतच प्रयोग करण्याची संधी मिळेल.
प्रकल्पाचे सकारात्मक परिणाम :
प्रत्यक्ष प्रयोग करणारे विद्यार्थी विज्ञानाच्या संकल्पना खूप जास्त कळल्याचा आनंद व्यक्त करतील.
त्यामुळे विद्यार्थी भविष्यातील Engineering, Medical, Research व Science संबंधित कुठल्याही क्षेत्रात उज्ज्वल कामगिरी करतील आणि सहजपणे अपेक्षित यश मिळवतील हा आमचा ठाम विश्वास आहे.