Image module
Image module
  • प्रकल्पाची गरज :

“Practice makes Perfect” हे वाक्य खरे आहे. शिकल्यानंतर जर विद्यार्थ्यांनी सराव केला, तर शिकलेल्या गोष्टी कायमस्वरूपी लक्षात राहण्याची शक्यता वाढते. सराव विद्यार्थ्यांना जे माहित नव्हते ते समजण्यास मदत करेल आणि परीक्षेला बसण्यापूर्वी ते ज्ञान प्राप्त करण्यास मदत करेल. नियमीत सराव विद्यार्थ्यांना विषयात तज्ञता प्राप्त करण्यास, वेळेचे नियोजन करण्यास, प्रगतीचे विश्लेषण करण्यास, आत्मविश्वास बाळगण्यास आणि तणाव कमी करण्यास मदत करेल.

खरं तर असे लाखो गुणवंत विद्यार्थी आहेत ज्यांना वेळेवर जर तज्ञांचे मार्गदर्शन लाभले तर ते अभूतपूर्व यश प्राप्त करू शकतात. पण इच्छा असूनही प्रत्येक विद्यार्थ्याला तज्ञांकडून मार्गदर्शनाची संधी मिळेलच असे सांगता येत नाही. पण त्यांना कमीत कमी योग्य प्रकारच्या शैक्षणिक साहित्याची (Study Material) उपलब्धता जरी वेळेवर झाली तरी ते त्याचा पुरेपूर फायदा घेऊन यशप्राप्ती करू शकतील.

तसे तर सध्याच्या ऑनलाईन (Online) वातावरणात कुठल्याही परीक्षेसाठी Internet वर हजारो प्रकारच्या शैक्षणिक साहित्याची (Study Materials) यादीच येते. पण विद्यार्थ्यांकडे उपलब्ध असणाऱ्या वेळेत जर पाहिजे त्या परीक्षेसाठी अतिशय सुटसुटीत शैक्षणिक साहित्य (Study Material) त्यांना मिळाले तर भरपूर साहित्यातून योग्य साहित्य
निवडण्यासाठीचा विद्यार्थ्यांचा वेळ वाचेल. तोच वेळ विद्यार्थी अभ्यासासाठी वापरून वेळेचा सदुपयोग करू शकतील.

  • प्रकल्पाची अंमलबजावणी :

विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासाच्या आमच्या संकल्पातील पुढची कडी ही PRACTICE ZONE.

Image module

ह्या संकल्पनेद्वारे आमच्याकडून विद्यार्थ्यांना शालेय स्तरावरील स्पर्धा परीक्षांचे योग्य साहित्य (Study Material/Defined Study Package) वेगवेगळ्या स्वरूपात उपलब्ध करून दिले जाईल.

  • प्रकल्पाचे सकारात्मक परिणाम :
  • शिकवल्यानंतर सराव करणारे विद्यार्थी अपेक्षित यश मिळवतील आणि ज्या विद्यार्थ्यांना शिकण्याची इच्छा असूनही तज्ञ शिक्षक लाभले नाही, तरी असे विद्यार्थी आम्ही तयार केलेले शैक्षणिक साहित्य (Study Material) वापरून स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर निर्धारित यशप्राप्ती करतील हा आमचा ठाम विश्वास आहे.