आयुष्याच्या प्रत्येक वळणावर, योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची क्षमता जर विद्यार्थ्यामध्ये आली तरच तो खरा निर्णयक्षम यशस्वी व्यक्ति होऊ शकतो. यासाठी MAT ZONE ही विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासाच्या आमच्या संकल्पातील पहिली कडी आहे.
इयत्ता 1 ली पासून 10 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठीच्या या महत्त्वाकांक्षी उपक्रमात, बुद्धिमता क्षमता चाचणी [ Mental Ability Test (MAT) ] या विषयासाठी आम्ही स्वतंत्र अभ्यासक्रम बनविला आहे.
हा विषय इतर विषयांसह शालेय अभ्यासक्रमात शैक्षणिक विषय म्हणून समाविष्ट केला जाईल.
त्यानंतर MAT ZONE चे तज्ञशिक्षक विद्यार्थ्यांना बुद्धिमता क्षमता चाचणी [ Mental Ability Test (MAT) ] हा विषय शिकवतील.
MAT ZONE Live interactive ऑनलाईन (Online) किंवा ऑफलाईन (Offline) प्रत्यक्ष किंवा आवश्यकतेनुसार दोन्ही पद्धती मिळून वर्ग आयोजित करते.
शाळेसोबत चर्चेनंतर शाळेच्या वेळेत किंवा इतर सोयीस्कर वेळी वर्ग आयोजित केले जातील.
यासोबत आमच्या तज्ञ शिक्षकांनी बनविलेले; संकल्पना (Concept) मजबूत करण्यासाठी आणि सरावासाठी (Revision) रेकॉर्ड केलेले व्हिडिओ, प्रत्येक धड्यावर (Chapterwise) प्रॅक्टिस आणि टेस्ट उत्तरांसह, संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित टेस्ट (Mock Test) OMR प्रॅक्टिससह आणि मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका (Previous Year Question Papers) असणारा MAT ZONE App आम्ही देतो.
- आज बुद्धिमता क्षमता चाचणी [ Mental Ability Test (MAT) ] शिकणाऱ्या विद्यार्थ्यांमधील लहान वयापासूनचा वैचारिक पद्धतीतील सकारात्मक बदल ठळकपणे दिसत आहे.
- पालकांसोबत घरी MAT ZONE या Mobile App मधील व्हिडिओ पाहून, प्रश्न सोडवून शिकताना संपूर्ण कुटुंबच एक वेगळ्या जगात गेल्याचे दिसून येत आहे.
- लहानपणापासूनच्या या वैशिष्ट्यपूर्ण विषयाच्या अभ्यासामुळे, विद्यार्थ्यांना शांतपणे प्रश्न वाचून वैविध्यपूर्ण विचार करण्याची सवय लागेल.
- ह्यामुळे शालेय स्तरावरील प्रत्येक स्पर्धा परीक्षा (Government Scholarship, MTSE, NTSE,Olympiads इ.) आणि भविष्यात करिअर ठरविणाऱ्या विविध परीक्षा आणि उच्च शिक्षणच्या प्रवेश पूर्व परीक्षा विद्यार्थ्यांसाठी जीवघेण्या नसतील व त्यामध्ये विद्यार्थी निश्चितच यशस्वी होतील हा आमचा ठाम विश्वास आहे.