मागील कित्येक वर्षांपासून आपण एक गोष्ट ऐकतोय की शिक्षण क्षेत्रात जीवघेणी स्पर्धा आहे व ती वाढतच चालली आहे. कधीकधी तर एका मार्काने आयुष्य बदललेले चित्र पण बघायला मिळते.
पण शांतपणे विचार केला तर लक्षात येईल की कुठलीही स्पर्धा जिंकणाऱ्यांसाठी कधीच जीवघेणी नसते कारण त्यांच्या तयारीचा नीट अभ्यास केला तर त्यांनी खूप लहान वयापासूनच गरजेचा पाया भक्कम करत अभ्यास केलेला असतो.
शालेय स्तरावरील स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रातील माझ्या मागील पंधरा वर्षांपेक्षा जास्त, प्रत्यक्ष अध्यापन व मार्गदर्शनाच्या अनुभवातून मी एक गोष्ट आवर्जून सांगू इच्छितो की कुठल्याही अभूतपूर्व यशासाठी विद्यार्थ्याला बालवयापासूनच सर्वांगीण विकसित करण्यावर लक्ष देणं आवश्यक आहे.
सर्वांगीण विकसित विद्यार्थी म्हणजे ज्याला कुठल्याही परिस्थितीचे शांतपणे अवलोकन करून त्यावर विविध तर्कांच्या माध्यमातून विचार करून सर्वोत्कृष्ट निर्णय घेण्याची क्षमता असते, आणि ती क्षमता विविध शिक्षण पद्धतींद्वारे निर्माण केली गेली पाहिजे.
या सर्व घडामोडींवर खूप जवळून लक्ष देत जगत आल्यामुळे आज काही प्रचलित आणि नाविन्यपूर्ण शिक्षण पद्धतींद्वारे विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासाच्या संकल्पातून “ अभ्युदय एज्यु कन्सल्टन्सी ” ची स्थापना केली आहे.