अतिशय वेगाने बदलणाऱ्या शैक्षणिक वातावरणात जर आपल्या पाल्याला योग्य वेळी योग्य मार्गदर्शन मिळाले तर अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने लहानपणापासूनच आवश्यक विषयांची व पर्यायाने भविष्यात द्याव्या लागणाऱ्या सर्व परीक्षांची यशस्वीपणे हाताळणी होऊ शकते.
आपल्याकडील प्रचलित पद्धतीत साधारणतः 10 वीच्या आसपास विद्यार्थ्यांचे Counselling केले जाते व त्यावरून पुढील दिशा ठरविण्याचा प्रत्यन केला जातो. पण जेवढ्या कमी वयात ध्येयपूर्तीसाठी तज्ञांसोबत चर्चा केली जाते तितकेच विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी फायदेशीर ठरू शकते. कारण सध्याच्या बदलत्या शैक्षणिक वातावरणानुसार सर्व उपलब्ध संधींवर चर्चा होऊन विद्यार्थ्याला व पर्यायाने त्याच्या कुटुंबाला काय फायदेशीर ठरू शकते हे ठरविण्यास खूप मदत होऊ शकते.