‘ अभ्युदय ’ ही एक शैक्षणिक सल्लागार संस्था आहे, जी शाळांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेच्याच आवारात शाळेच्याच वेळेत विविध शालेय स्तरीय स्पर्धा परीक्षांच्या तयारी करण्यास मदत करते. आमच्या महत्त्वाकांक्षी आणि नाविन्यपूर्ण प्रकल्पांद्वारे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करून, विद्यार्थी आणि स्पर्धा परीक्षांच्या यशामधील अंतर कमी करण्याचे आमचे लक्ष आहे.

‘ अभ्युदय ’ येथे, आम्ही शाळा आणि विद्यार्थ्यांना विविध शालेय स्तरीय स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी उच्च स्तरीय शैक्षणिक मार्गदर्शन आणि आवश्यक शैक्षणिक सहाय्यता प्रदान करतो. योग्य शैक्षणिक मार्गदर्शन आणि शैक्षणिक सहायतेद्वारे, ‘ अभ्युदय ’ यशाची दारे उघडण्यास मदत करेल जेणेकरुन विद्यार्थी त्यांची सर्व स्वप्ने आणि इच्छा साध्य करू शकतील.

Image module

ध्येय

शाळांना त्यांच्या विद्यार्थ्यांना सर्व शालेय स्तरीय स्पर्धा परीक्षांसाठी तयार करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक मार्गदर्शन आणि शैक्षणिक सहकार्य प्रदान करण्याचे आमचे ध्येय आहे.

दूरदृष्टी

प्रत्येक शाळेला शिक्षणाचे खरे केंद्र बनविण्याची आमची दूरदृष्टी आहे, जेथे विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणासह स्पर्धा परीक्षेची तयारी प्रदान केली जाते.

उद्देश

आमचे उद्देश आहे की विद्यार्थ्यांची सर्व शालेय स्तरीय स्पर्धा परीक्षांची तयारी त्यांच्या शाळेच्याच आवारात शाळेच्याच वेळेत व्हावी.

संकल्पना

शालेय स्तरीय स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांना बुद्धिमता क्षमता चाचणी [ Mental Ability Test (MAT) ] हा विषय ‘ अभ्युदयच्या ’ तज्ञ शिक्षकांकडून शिकवला जाईल. उर्वरित शालेय विषय (विज्ञान, गणित, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र) स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी आम्ही शाळेच्या शिक्षकांना शैक्षणिक प्रशिक्षण प्रदान करतो.

मुलभूत मूल्ये

प्रामाणिकपणा : आम्ही आमच्या कामात प्रामाणिकपणाचे आश्वासन देतो.
उत्कृष्टता : आम्ही आमच्या सर्व शैक्षणिक कार्यात उत्कृष्टतेसाठी प्रयत्न करतो.
नाविन्यता : आम्ही आमच्या सर्व शैक्षणिक कार्यात सतत सुधारणा करत पुढे जातो.
संघकार्य : आम्ही परिणामकारक निकालांसाठी एकत्र काम करतो.
वचनबद्धता : आम्ही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी वचनबद्ध आहोत.

विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासासाठी आणि त्यांना स्पर्धा परीक्षांना आत्मविश्वासाने सामोरे जाऊन अभूतपूर्व यश मिळवण्यासाठी ‘ अभ्युदय ’ चे ५ झोन सतत प्रयत्नशील राहतील.

इयत्ता 1 ली ते 10 वीच्या विद्यार्थ्यांना
बुद्धिमता क्षमता चाचणी [ Mental Ability Test (MAT) ] हा विषय शिकवण्यासाठी.

इयत्ता 1 ली ते 10 वीच्या विद्यार्थ्यांना
शालेय स्तरावरील विविध
स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी.

इयत्ता ४ थी ते १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी;
त्यांच्या क्षमता, कामगिरी आणि इच्छेनुसार
त्यांना उत्तम संभाव्य करिअर पर्याय निवड
करण्यास मदत करण्यासाठी.

शिकविल्यानंतर विद्यार्थ्यांना सराव
करण्यासाठी किंवा ज्या विद्यार्थ्यांना तज्ञांचे मार्गदर्शन लाभले नाही त्यांना स्वबळावर
तयारी करण्यासाठी.

इयत्ता ४ थी ते 10 वीच्या विद्यार्थ्यांसाठी
विज्ञानाचे प्रयोग करण्यासाठी शाळेत सुसज्ज प्रयोगशाळा उभारण्यासाठी.